उस्मानाबाद (प्रतिनिधी) :

सततच्या पावसाचे अनुदान 222 कोटी व सन 2022 चा खरीप पिक विमा 250 कोटी विमा कंपनीकडून मिळत नसल्यामुळे 22 डिसेंबर रोजी येडशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या सततच्या पावसाचे अनुदान 222 कोटी रुपये घोषणा करून वीस दिवस होऊन गेले परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाची रक्कम प्राप्त झालेली नाही त्याचप्रमाणे सन 2022 च्या खरीप पिक विमा रक्कम 250 कोटी पिक विमा कंपनीकडून येणे असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 254 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत विमा कंपनीकडे पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांनी पूर्व सूचना देऊनही दीड लाख शेतकऱ्यांच्या पूर्व सूचना पिक विमा कंपनीने फेटाळल्या आहेत त्याचप्रमाणे वस्तूस्थिती पडताळणीसाठी पाठवलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे चुकीचे केलेले आहेत ते पंचनामे व्यवस्थित करून जिल्ह्यातील व सूचना देणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट मिळण्यासाठी वेळोवेळी कृषी मंत्री जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊनही काही उपयोग न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नाईला जास्त 22 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता येडशी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबतचे जिल्हाधिकारी यांना सोळा डिसेंबर रोजी संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदन दिले आहे.


 
Top