उमरगा /प्रतिनिधी-

२३ गावच्या सरपंच पदासाठी ६९ नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून एकूण २२३ सदस्य संख्येच्या निवडी साठी ५२० अर्ज वैद्य ठरले असून यातील २९ सदस्य बिनविरोध निगाल्याने आत्ता सदस्य पदासाठी ४९१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

दाखल सरपंच पदाचा नामनिर्देशन पत्रानुसार नऊ ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होत आहे तर आठ गावच्या सरपंच निवडीसाठी तिरंगी लढत होत आहे इतर ठिकाणी बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

भुसणी/भुसणीवाडी गावात एकूण चार प्रभाग असून एक सरपंच व ११ सदस्य निवडून द्यायचे आहेत यात तीन अर्ज सरपंच निवडी साठी दाखल असून २९ अर्ज सदस्य निवडीसाठी आहेत.कंटेकुर मध्ये नऊ सदस्या करिता १८ अर्ज दाखल असून सरपंच पदाकरिता दोन अर्ज आले आहेत. बेळंब ११ सदस्यांकरिता २१ अर्ज दाखल आहेत तर तीन अर्ज सरपंच पदासाठी आहेत. कलदेवलिबाळा येथे नऊ सदस्य संख्येसाठी २२ अर्ज राहिले असून सरपंच पदा करिता दोन अर्ज आहेत. चिंचोली (ज) येथे नऊ सदस्यांसाठी १८ अर्ज असून सरपंच पदास दोन अर्ज आहेत.त्रिकोळीत नऊ जागेसाठी २२ अर्ज आहेत तर सरपंच पदा करिता दोन अर्ज आहेत. कोथळी येथे ११ जागेकरिता २२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर सरपंच पदा करिता तीन अर्ज आहेत.धाकटी वाडी येथे सात जागे करिता १४ उमेदवार असून सरपंच पदासाठी तीन उमेदवार आहेत. चिंचोली (भु) काटेवाडी ११ जागे करिता १५ उमेदवार रिंगणात आहेत तर सरपंच पदासाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.

औराद मध्ये सदस्यांस १८ जणांचे अर्ज आहेत तर सरपंचा करिता तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येणेंगुर येथे १५ जागेकरिता ५२ जण रिंगणात असून तीन उमेदवार सरपंच पदाची निवडणूक लढवत आहेत. एकुरगा/ एकुरगा वाडीत ११ जागे करिता ३५ उमेदवार निवडून लढवत असून सरपंच पदा करिता तिघे जण रिंगणात उतरले आहेत. कोराळ येथे नऊ जागेस १४ उमेदवार असून सरपंच पदा करिता तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नारंगवाडीत ११ जागेसाठी २६ उमेदवार असून सरपंच पदास चार उमेदवार आहेत. केसरजवळगा येथे १३ जागेकरिता २७ उमेदवार असून तीन सरपंच पदाची निवडणूक लढवत आहेत. आलूर गावात १७ जागेकरिता ५३ उमेदवार रिंगणात असून सरपंच पदा करिता चार जण नशीब आजमावत आहेत. माडज येथे १३ जागेस ३० उमेदवार असून पाच सरपंच पदांची निवडणूक लढवत आहेत. मळगी येथे नऊ जागेकरिता १७ उमेदवार असून सरपंच पदास दोन उमेदवार आहेत.वरनाळवाडीत सात जागेकरीता १३ उमेदवार असून दोन जण सरपंच पदांची निवडणूक लढवत आहेत. सूंदरवाडीत नऊ जागेकरिता १८ उमेदवार असून सरपंच पदास सहा उमेदवार आहेत. मळगीवाडीत सात जागेकरिता दहा अर्ज असून सरपंच पदास दोन अर्ज आहेत तर महालिंगराय वाडीत सात जागेस सात उमेदवार असून केवळ सरपंच पदांच्या निवडीसाठी दोन अर्ज असल्याने इथे निवडणूक लागली आहे. तर आनंदनगर येथे नऊ जागेकरिता १९ उमेदवार असून तीन उमेदवार सरपंच पदाची निवडणूक लढवत आहेत.

 गावनिहाय्य बिनविरोध सदस्यांनी नावे पुढील प्रमाणे

महालिंगराय वाडी, (सात) १) शाहूंराज जाधव,२) सुरेखा लखन गावे, ३)दत्तू जगताप,४) माधुरी खंडागळे, ५)युवराज घोरपडे, ६)अर्चना चव्हाण, ७)उज्वला डोंगरे.

कोराळ (सहा) १)रेखा कांबळे, २)पार्वती सुरवसे, ३)मंजुषा सगर,  ४) गोकर्ना भगत,  ५)जीवन शिंदे, ६) निर्मला भगत.

मळगी (एक) १) कलिंदा कांबळे

कोथळी( तीन) १) संजना शेवाळे, २) लक्ष्मीबाई सुरवसे, ३) पूजा गावडे,

माडज (पाच) १) मंगलबाई पाटील, २) पूजा पुरी, ३) छाया जाधव, ४) सरस्वती कदम, ५) मोहिनी माने, 

 औराद (चार) १) संगीता घाटे, २) नीता दूधभाते, ३) निखिल गायकवाड, ४)लक्ष्मीबाई गायकवाड,

मळगीवाडी (तीन) १) अर्चना कदम, २)अनुसया आडवे, ३) जीवन जमादार,

चिंचोली भुयार( सात) १) रणजित गायकवाड, २)अश्विनी गायकवाड, ३) अपर्णा थोरात, ४) प्रमोद गायकवाड,५) महादेव गायकवाड, ६) ज्ञानेश्वर वाकळे,  ७) चांद तांबोळी

 
Top