नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा यात्रेत दि.७  जानेवारी २०२३ रोजी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे पुजन दि.११ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा दृष्टी उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

          नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा यात्रेत तुळजापुर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील पैलवानांना कुस्ती खेळण्याची चांगली संधी मिळाली यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री खंडोबा देवस्थान कुस्ती आखाडा समितीच्या वतीने गेल्या तीन चार वर्षांपासुन याठिकाणी भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात याठिकाणी महाराष्ट्र केसरी विजेते पैलवानांसह नामवंत व राज्यात गाजलेल्या पैलवानांनी हजेरी लावली आहे.

         यावर्षी ही भव्य कुस्ती स्पर्धा दि.७ जानेवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी केले आहे. या भव्य कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी आतापासुनच सुरू करण्यात आली आहे. मैलारपुर येथील या भव्य कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे पुजन दि.११ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या करण्यात आले. यावेळी श्री खंडोबा देवस्थान कुस्ती आखाडा समितीचे अध्यक्ष राजा ठाकुर,शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, माजी नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले,संजय मोरे, सुधीर हजारे,किशोर नळदुर्गकर,शरीफ शेख, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, शिवाजीराव वऱ्हाडे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे, व्हा. चेअरमन ताजोद्दीन सय्यद,रुकनोद्दीन शेख, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोतदार, विशाल डुकरे, कुस्ती समितीचे उपाध्यक्ष अनिल पुदाले,सुधाकर चव्हाण, सतीश पुदाले आदीजन उपस्थित होते.

        या भव्य कुस्ती स्पर्धेत तुळजापुर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील पैलवानांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी केले आहे.


 
Top