कळंब / प्रतिनिधी-

 राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा  फुले यांनी सर्वप्रथम  शाळा सुरु केल्या व या सर्वानी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिले नाही. त्यां नी लोकांकडे भिक मागितली व शाळा चालु ठेवल्या  असे बेताल वक्तव्य करुन महापुरुषांच्या शैक्षणिक कार्याचा अवमान केला आहे. मागील काही महिण्या पासुन भाजप चे संबंधित मंत्री, पदाधिकारी हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्याने विधान करुन महापरुषांचा अवमान करत आहेत.  हे राज्यात दंगली पेटवण्याचे व कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे नियोजनबद्ध षढयंत्र  आहे

 मुख्यमंत्री यांना विनंती करण्या त येते की, महाराष्ट्रामध्ये मा. राज्यपाल हे छ .शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरत आहेत .यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी , महाराष्ट्र मंत्री मंडळातील व केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री यांना देखील समज द्यावी व बेताल वक्तव्य‍ करण्यापासुन वेळीच रोखावे.

 महापुरुषांचे  अनुयायी महाराष्ट्रात अशा बेताल वक्तव्य करुन  बदनामी करणा-याला या तालुक्याुत व जिल्ह्यारत फिरु देणार नाहीत. तरी  जिल्ह्यामध्ये अशा गोष्टीमुळे काही उपद्रव झाल्यास शासन जबाबदार राहील. 

     महापुरुषांच्या बदनामी करणार्‍यांचा निषेध करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन मंत्री चंद्रकात पाटील, राज्यपाल भगतसिंग कोशारी व जगदीश गायकवाड यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करुण निषेध नोंदविला. यावेळी  रिपब्लिकन सेना  चे जिल्हाप्रमुख अनिल हजारे वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे, प्रा अरविंद खांडके, रसूल खान, सुरज वाघमारे, सुहास शिंदे ,बंटी गायकवाड ,अजय माने, विशाल वाघमारे ,अप्पासाहेब हजारे ,महेश गायकवाड, विशाल धावारे, राहूल गाडे ,अमित गांजीकर, प्रतिक निकाळजे ,पिंटू गवळी ,आदमाने शरद, गाडे भैय्या, सनी हजारे आदींची उपस्थिती होती. 


 
Top