उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभागामार्फत “आरंभ” मॅनेजमेंट फेस्टिवलचे आयोजन दिनांक १४ आणि १५ डिसेंबर २०२२ दरम्यान केले गेले. सदर फेस्टिवल मध्ये प्रथम दिवशी एम. बी. ए. आणि एम. सी. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट कब्बडी, चेस, रनिंग ईत्यादी स्पर्धेचे आयोजन केले गेले. या सर्व स्पर्धेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदऊन प्रतिसाद दिला. कोव्हीड नंतर होत असणाऱ्या विविध कार्यक्रमास सर्व घटका कडून उस्त्पुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. द्वितीय दिवशी सर्व एम. बी. ए. आणि एम. सी. ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थांची नवीन प्रकारे ओळख आणि त्यांचे व्हिजन स्पष्ट केले. पुढील दोन वर्षातील त्यांचा प्रवास आणि ठेवलेले उदिष्ट्य कसे मिळवले जाईल याची त्यांनी मांडणी केली.

  सांस्कृतिक स्पर्धेत विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडला. विभागात नवीन आलेल्या विद्यार्थ्या पैकी विविध प्रकारात भाग घेऊन शेवटच्या “प्रश्न-उत्तर” फेरीत चांगले सादरीकर केलेल्या मधून “मिस आणि मिस्टर यु. डी. एम. एस. उस्मानाबाद” ची निवड केली गेली. साक्षी अवाड आणि किरण ठाकरे हे अनुक्रमे विजेते ठरले. बक्षीस समारंभात विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. बक्षीस समारंभास शिक्षण शास्त्र विभागाचे डॉ. जितेंद्र शिंदे प्रमुख म्हणून उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, कार्यक्रमाचे समन्वयक श्री. सचिन बस्सैये, डॉ. विक्रम शिंदे, श्री. वरून कळसे, श्री. शीतलनाथ एखंडे,  श्री. रितेश घोलप, सुप्रिया सुकाळे, श्री. सुरेश टकले, श्री. शरद गिलबिले, श्री. शरद सावंत, अश्विनी भोसले, आरती माळी उपस्थित होते. “आरंभ” मॅनेजमेंट फेस्टिवलचे सर्व व्यवस्थापन हे विद्यार्थांनी केले होते. यामध्ये मुस्कान पठाण, अजय इंगळे, संतोष भंडारे, दानिश काझी, ऐश्वर्या शेरखाने,सुयोग भांगे,पूजा राठोड, गौरी जावळे आणि त्यांच्या टिमने मेहनत घेतली. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थाच्या या उपक्रमातून व्यवस्थापनाचे विविध पैलू शिकता येतात आणि विद्यार्थांना नाविन्यता प्रत्येक्षात उपयोगात आणता येते. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे मा. कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, प्र कुलगुरू प्रा. डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव प्रा. डॉ. भगवान साखळे, अधिष्ठाता प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे,  उप परिसर संचालक प्रा. डॉ. डी. के. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top