उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप बाळासाहेब देशमुख यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील रसायनशास्त्राच्या अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रम प्राधिकरणासाठी दिनांक 10 डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली होती. दिनांक 13 डिसेंबर रोजी त्या निवडणुकीची मतमोजणी होऊन मतमोजणी निकालानुसार अभ्यास मंडळ रसायनशास्त्र प्राधिकरणावर कलम 40(2)(c) निवड करण्यात आली. यापूर्वी देखील प्रा.डॉ.संदीप देशमुख यांनी संशोधन क्षेत्रांमध्ये आपले मोठे योगदान दिले आहे. त्यांचे अनेक संशोधन पर लेख आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहेत. अनेक वेळा त्यांनी साधन व्यक्ती म्हणून विविध महाविद्यालय मध्ये विविध विषयावर व्याख्याने दिलेली आहेत. संशोधन क्षेत्रामध्ये त्यांचे भरीव योगदान आहे.

    या त्यांच्या निवडीबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव  प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.    या निवडीबद्दल डॉ. संदीप देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .


 
Top