तेर (प्रतिनिधी ) 

राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या   उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आले असून सरपंच पदासह दहा जागेवर यश संपादन केले तर आघाडीने सात जागा जिंकल्या आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे डॉ.पद्मसिंह पाटील ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार दिदी काळे विजयी झाल्या असून ग्रामपंचायत सदस्याच्या 17 पैकी 10 जागा जिंकण्यात यश आले आहे.यामध्ये सुवर्णा माळी,लतिफा कोरबू,नवनाथ पसारे, अर्चना लोमटे,गितांजली साळुंके,अजित कदम, राजकन्या काळे,प्रतिक नाईकवाडी,रामा कोळी, श्रीमंत फंड विजयी झाले आहेत.तर शिवसेना,काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आघाडीचे संत गोरोबा काका ग्रामविकास पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले आहेत.यामध्ये अमोल कसबे, अविनाश आगाशे,भाग्यश्री आंधळे,जयश्री रसाळ , बापू नाईकवाडी, प्रियंका रसाळ,आशा कांबळे विजयी झाले तर आम आदमी पार्टी व रासपच्या वैराग्य महामेरू ग्रामविकास पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाब उधळून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला.      

 
Top