उस्मानाबाद :(प्रतिनिधी ) 

  जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धे मध्ये फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलींनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला . या विजयी संघाला क्रीडा अधिकारी  लटके यांनी पारितोषिक प्रदान केले.

 या संघाला प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक इंद्रजित वाले , विक्रम सांडसे, पर्यवेक्षक जाधव आर . बी. व संघातील खेळाडूसह कप्तानाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीर पाटील , संस्था सचिव सौ. प्रेमाताई पाटील , प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, संस्थासदस्य तथा या प्रशालेचे नियोजनबद्ध , कार्य कुशलेतेने काम पाहणाऱ्या सौ. मंजुळाताई आदित्य पाटील व प्रशालेचे प्राचार्य सी. चतुर्वेदी यांनी अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top