उस्मानाबाद / प्रतिनिधी-

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड द्वारा आयोजित विभागीय शालेय जुदो स्पर्धा दि. २६ व २७ डिसेंबर रोजी नांदेड येथे पार पडल्या. या स्पर्धेत शरद पवार हायस्कूल उस्मानाबादचे चार जुदो खेळाडू विजयी झाले. व राज्य स्तरीय स्पर्धेसाठी लातूर विभागाचे नेतृत्व करण्यासाठी पात्र ठरले. 

१४ वर्षाखालील ४४ किलो वरील वजनी गटात कु. संस्कृती धावणे १७ वर्ष वयोगटात ५७ किलो खालील गटात स्नेहल पालवे, ६३ किलोखालील वजनी गटात कु. पौर्णिमा खरमाटे व १९ वर्ष वयोगटात ८१ किलो वजनाखालील धनराज पवार या सर्व यशस्वी खेळाडूंना संस्था अध्यक्ष विजयनाना दंडनाईक, रोहीतराज दंडनाईक, प्राचार्य सुरेश चौधरी, गुणवंत काळे सर व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, व क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

या जुदो खेळाडूला प्रमुख मार्गदर्शन उस्मानाबाद जिल्हा असोशिएशनचे सचिव प्रवीण गडदे सर, कोच कैलास लांडगे सर क्रीडा शिक्षक प्रभाकर खरमाटे सर, कुलदीप सावंत सर, अभय वाघोलीकर, संदीप वांजळे, जिल्हा क्रीडा अधिकारी हरनाळे, कैलास लटके, उदय काकडे, गोडसे सर, वामन दादा गाते, संतोष नलावडे, पै. केंद्रे वस्ताद पै. जाधवर वस्ताद, सापते सर व घार्गे सर या सर्वाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी सर्व खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. हे सर्व खेळाडू महर्षी शिवाजीराव नलावडे कुस्ती संकुल मध्ये पुढील वाटचालीसाठी सराव करीत आहेत.


 
Top