उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या हस्ते दि .२७ रोजी प्रवेश संपन्न झाला .माजी पं. स. सदस्य संजय बाजीराव देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश .

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असून तळागाळापर्यंत सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे. ज्येष्ठ नेते शरदचंद्र  पवार  यांचे विचार व कार्यावर प्रेरित होऊन प्रवेश करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट कले .

 तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या मोजे काटी ता.तुळजापूर  गावातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश झाला. यात पक्षांमध्ये प्रवेश करणारे माजी पं. स. सदस्य  संजय बाजीराव देशमुख , प्रवीण घाटे, सुरत शशिकांत साळुंखे, कादर लतीफ शेख, अनुसया राजेंद्र काटे, बाळकृष्ण नागनाथ घायाळ,  अमरसिंह बाजीराव देशमुख, सत्यजित अजय देशमुख, अमित अजयसिंह देशमुख,अमोल अमरसिंह देशमुख, प्रदीप सुभाष देशमुख, चेतन भोसले ,बाबासाहेब साळुंखे.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद शहर उपाध्यक्षपदी  समीर अलीम शेख, विनोद विलासराव जाधव, अरफात शफिक काझी यांची नियुक्ती करण्यात आली.त्याचबरोबर उद्योग व्यापार विभाग राष्ट्रवादी काँग्रेस उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी युवराज सुखदेव राठोड, जिल्हा सचिव पदी पांडुरंग हरिश्चंद्र बिराजदार, सरचिटणीस पदी लिंबराज दगडू सोनटक्के, जिल्हा संघटक पदी झिशान जुनेद काजी, महेश सुरते आदींचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झाला.

  याप्रसंगी  जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, कळंब उस्मानाबाद विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव,उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज (बबलू) शेख, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे, तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, वक्ता सेलचे प्रमुख प्रा.तुषार वाघमारे, उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष विवेक घोगरे, सां. वि. जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, लीगल शहराध्यक्ष ॲड.योगेश सोन्ने पाटील, माजी नगराध्यक्ष बाबा मुजावर,महेश चोपदार आदींची उपस्थिती होती.


 
Top