उस्मानाबाद / प्रतिनिधी-

चिखली (ता.उस्मानाबाद) येथे संपन्न झालेल्या किशोर किशोरी अजिंक्यपद निवड चाचणी कब्बडी स्पर्धेत मुलामध्ये भुमच्या शिवनेरी क्रिडामंडळाने तर मुलीमध्ये डोंगरेवाडी येथील संघाने विजेतपद पटकाविले. मुलामध्ये उपविजेत पद पाथरुडच्या भाऊराव विद्यालयाने तर मुलीमध्ये डोंगरेवाडी येथील मुलीने दुसरा क्रमांक पटकावित उपविजेता होण्याचा मान मिळविला.

उस्मानाबाज जिल्हा कबड़्डी असोसिएशन, सुप्रिया सुळे क्रिडामंडळ यांच्यावतीने (ता.पाच) रोजी किशोर -किशोरी जिल्हा अजिंक्यपदाची स्पर्धा आयोजीत केली होती. यातुन जिल्ह्याचा संघही निवडण्यात येणार असल्याने या स्पर्धेला जिल्ह्यातील अनेक संघानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतुन 15 ते 18 डिसेंबर रोजी शिरुर (ता.अहमदपुर,जि.लातुर) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी संघ निवडला गेला आहे. या कार्यक्रमाचे बक्षिसवितरण चिखलीच्या सरपंच वृंदावणी जाधवर, राज्य कबड्डी असोसिएशचने सहसचिव महादेव साठे, राज्य कबड्डी असोसिएशन पंच मंडळ सदस्य लक्ष्मण मोहिते,क्रिडा मंडळाचे सचिव ह्रदयेश्वर सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. दिवसभर झालेल्या साखळी सामन्यात किशोर गटातील मुलामध्ये अंतिम सामन्यासाठी भुमच्या शिवनेरी क्रिडामंडळाची व पाथरुडच्या भाऊराव विद्यालयामध्ये यांच्यात लढत झाली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत भुमच्या शिवनेरी क्रिडामंडळाने बाजी मारत विजेतेपद पटाकविले.त्याच पध्दतीने मुलीच्या संघातही रोमहर्षक सामने पाहयला मिळाले. अंतिम लढत डोंगरेवाडी येथील दोन संघामध्येच झाल्याने ही लढत अधिकच रंगतदार झाली. शेवटी डोंगरेवाडी येथील एका संघाने यामध्ये गुणाची कमाई करीत विजेतेपदावर नाव कोरले.

बक्षिस समारंभास चिखली गावच्या जुन्या कबड्डी खेळाडुच्या हस्ते खेळाडुंचा सन्मान करण्यात आला. यावेळी चिखलीचे दिलीप जाधव, उत्रेश्वर सुरवसे, नवनाथ सुरवसे, युवराज माने, रंगनाथ वाठवडे,विश्वनाथ जाधवर, शंकर हातागळे, भानुदास बोंदर आदी मान्यवराच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.


 
Top