उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील नारायण कॉलनी संभाजी नगर, शाहुनगर, गालिबनगर, मिल्ली कॉलनी, सुलतानपुरा भागांतील विकासकामांना अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची सुटका होणार आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत   साळुंके यांच्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून खास बाब म्हणून विकासकामांना या भागातून सुरुवात झाली आहे.

 याबाबत बोलतांना प्रशांत   साळुंके म्हणाले की, प्रभाग क्रमांक 4 मधील नारायण कॉलनी संभाजी नगर शाहुनगर, गालिबनगर, मिल्ली कॉलनी, सुलतानपुरा भागातील नागरिकांची पावसाळ्यात होणारी हेळसांड लक्षात घेऊन नगर परिषद, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  या भागातील विकासकामे सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. जिल्ह्याचे खासदार, आमदार व नगराध्यक्ष यांच्याकडे वारंवार विनंती करून या भागातील नागरी समस्या दूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे शहरातील भूमिगत गटारी व रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. शाहुनगर, गालिबनगर, मिल्ली कॉलनी, सुलतानपुराव शहरात  आतापर्यंत जवळपास 30 किलोमीटरचे काम झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे श्री. साळुंके यांनी सांगितले. खासदार, आमदार व नगराध्यक्षानी मागणीची दखल घेऊनप्रभाग क्र चार मधून विकासकामांना शाहुनगर, गालिबनगर, मिल्ली कॉलनी, सुलतानपुरा संभाजी नगर नारायण कॉलनी मधून प्रथम सुरुवात केल्याबद्दल श्री. साळुंके यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले.


 
Top