उमरगा/ प्रतिनिधी-

मुरुम दि.26 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांची नाईचाकूर ता उमरगा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नुतन चेअरमन सतीश पवार व्हाईस चेअरमन रमेश पांचाळ व संचालक मंडळांनी आज विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरूम येथे सदिच्छा भेट घेतली.

 यावेळी पाटील साहेबांनी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी विठ्ठलसाई स. सा. कारखाना संचालक केशवराव पवार, प्राचार्य डॉ दिलीप गरुड, माजी जि.प.समाजकल्यान सभापती किसनराव कांबळे, सरपंच चद्रकांत स्वामी ,भिमाशंकर पवार, राजेंद्र डिगोळे ,सुरेश बाबळसुरे ,राजेंद्र पवार,महेंद्र कांबळे ,चद्रकांत जाधव ,आकाश पवार ,महेश वाघमारे जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

 
Top