उमरगा/ प्रतिनिधी-

तालुक्यातील तुगाव येथे सातवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद रविवारी (दि. २५)मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सहा वर्ष सातत्याने तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या गावात ही परिषद घेतली जाते. यावर्षी सातव्या धम्मपरिषदस डॉ.बी.आर. आंबेडकर फाऊंडेशन आणि त्रिरत्न बुद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती

परिषदेची संपूर्ण जबाबदारी संबोधी महिला ग्रामसंघ आणि भारतरत्न लेझीम संघ यांनी घेतली होती. रविवारी काळी धम्मध्वारोहण करण्यात आले,भिक्षूंच्या भोजनदाना नंतर परिषदेस सुरुवात झाली या वेळी भदन्त धम्मसार, भदन्त सुमंगल,विष्णू सगर,मारुती बनसोडे,एस.के.कांबळे(चेले),हरिश डावरे,दिलिप भालेराव,अरुण लोखंडे, रामभाऊ गायकवाड,मुकेश सोनकांबळे चंद्रकांत कांबळे, आदींची उपस्थिती होती.

 भदन्त धम्मसार यांनी संयोजन समितीच्या सर्वांचे कौतुक करुन छोट्याशा गावात सलग सातव्या वर्षी षरिषद होते याची नोंद सर्वांनी घेऊन प्रत्येक गावात परिषद घेतली पाहिजे असे आवाहन केले

भदन्त सुमंगल यांनी आपल्या खास शैलीत समाजातील अंधश्रद्धा,अज्ञान,आळस यांवर मार्मिक भाष्य करुन बुद्धाचे विचार सर्वांसाठी फायद्याचे असून आपल्या मुलांवर याचे संस्कार करावेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे यांनी केले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर ढोकी आणि तीर्थ (बु) येथील उत्खननात बुद्ध मूर्ती,शिल्प सापडली आहेत त्यांचे जतन करावे भारतीय जनगणना सुरु असून धर्माच्या रकान्यात केवळ बौद्ध लिहावे असे ठराव करण्यात आले.

परिषदेचे सूत्रसंचालन गोविंद कांबळे यांनी केले तर आभार भालचंद्र लोखंडे यांनी मानले षरिषदेचा समारोप राष्ट्रगीताने झाला परिषदेच्या यशस्वीतेसाठी संबोधी महिला ग्रामसंघाच्य सर्व महिला,व बलभीम गायकवाड, प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे, भालचंद्र लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top