उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यावेत यासह विविध मागण्यांसाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयासमोर दि.२६ डिसेंबर रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे.

परिपत्रक क्रमांक ५३६ प्रमाणे ESI व PF नियमाप्रमाणे वेळेत करण्यात यावा, कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनावर दिवसाप्रमाणे दंड आकारून दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तर उस्मानाबाद व लातूर येथे महावितरण अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा होऊन देखील मागील प्रश्न प्रलंबित असून ते सोडविण्यात यावेत. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांवर वेगवेगळ्या प्रकारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संगणकातून उस्मानाबाद येथे येणाऱ्या प्रत्येक गुत्तेदारांनी आमच्यावर सतत अन्याय केला आहे. तसेच सोलापूर येथील सोनू सर्विसेस या कंत्राटदाराने जाणीवपूर्वक कामगारांची पिळवणूक आर्थिक व मानसिक पद्धतीने करून देखील सच्चिदानंद वराटे, घनश्याम ठाकर, सुशील उपळकर, दिनेश जाधव, शंभू लाटे, कृष्णा निकेड, विलास शिंदे व राहुल भालेराव या कामगारांचे पेमेंट वेतन दिलेले नाही.


 
Top