उस्मानाबाद /प्रतिनिधी

शहरातील विकास कामावरील स्थगीती उठविण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्या उपोषणास शिंगोली आश्रमशाळेतील शिक्षक तथा समाजसेवक सतीश शहाजी कुंभार यांनी पाठींबा दिला आहे.

श्री.गुरव यांनी विकास कामावरील स्थगीती उठवीण्याच्या मागणीसाठी बुधवारपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणास शिंगोली आश्रम शाळेतील शिक्षक सतीश शहाजी कुंभार यांनी उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी उपोषणस्थळी जावून गुरव यांना पाठींबा दिला आहे.

 
Top