नाताळाच्या निमित्त संधी : चिमुकल्यांसह पालकांचेही मनोरंजन
उस्मानाबाद (प्रतिनिधी) :-
कोणालाही जादूचे प्रयोग आश्चर्यचकीत करुन कुतुहल निर्माण करतात. मनोरंजन आणि आनंद देणारे जादूचे प्रयोग आजही लोकप्रिय आहेत. त्यामुळे जगप्रसिद्ध जादूगार रघुराज यांच्या ‘मॅजिक शो’चे २४ आणि २५ डिसेंबर रोजी शहरातील समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्पलेक्स येथे करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय आयोजनात दुपारी ४ व सायंकाळी ७ याप्रमाणे प्रतिदिन २ असे एकूण ४ शो होणार आहेत. त्यामुळे उस्मानाबादकरांना जादूचे प्रयोग अनुभवण्याची संधी मिळणार आहे. हा शो चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबास या शोचा आनंद लुटता येणार आहे.
अडीच तासांच्या या प्रयोगामध्ये प्रेक्षकाच्या खिशात किती रुपये आहेत? ते सांगितले जाणार. प्रेक्षकांतील महिलांचे नाव स्टेजवर सांगितले जाणार. प्रेक्षकांची मोबाईल प्रमाने मेमरी हॅक करणार. प्रेक्षकांतील मुलगी स्टेजवर हवेत तरंगणार, असे अनेक जादूचे प्रयोगासह सुमधुर संगीत, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, इजिप्शियन, अमेरिकन, चायनीज, अरेबिक जादूचे चित्तथरारक नवनवीन जादुचे प्रयोग पाहता येणार आहेत. त्यासाठी दोन ट्रक जादूचे साहित्य, दहा कलाकार, भव्य स्टेज, मखमली पडदे, भरजारी वेशभूषा अशी व्यवस्था आहे.
या कार्यक्रमाचे तिकीट दर ३०० रुपये व २०० रुपये आहेत. आनंदाची बातमी म्हणजे सर्व शालेय मुलांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. कुपन असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना एका तिकिटावर ५० टक्के सूट मिळणार आहे. मात्र, त्यासाठी कुपन दाखवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी ९४२२६५४३३१ आणि ८८०६७९९८७३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य आयोजक अजहर सौदागर यांनी केले आहे.
...म्हणून सर्वांनी शो बघावा
आज विज्ञान तंत्रज्ञानाचा काळ आहे. मुले मोबाईलच्या गेम्स आणि टीव्हीवरील कार्टून्स मध्ये अडकली आहेत. पोकोमॅन व डोरोमॅनच्या मागे लागलेल्या मुलांना प्रत्यक्ष जादूचे प्रयोग पाहिल्यास खूप आनंद होईल. त्यांचे चांगले मनोरंजन सुध्दा होईल. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुलांसह येऊन जादूच्या प्रयोगाचा आनंद घ्यावा, असे मुख्य आयोजक अजहर सौदागर यांनी प्रसार-माध्यमांशी बोलताना सांगितले.