उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दिनांक 20 व 21 डिसेंबर रोजी लातूर येथे झालेल्या विभागीय शालेय लॉन टेनिस क्रीडा स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षे वयोगटांमध्ये स्वराज देशमुख याने   प्रथम क्रमांक पटकावला तर चौदा वर्षे वयोगटांमध्ये सुयश आडे याने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोघांचीही निवड राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी झालेली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल उस्मानाबाद जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष युवराज नळे यांनी त्यांचा सत्कार करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव हर्षद जैन, व सदस्य प्रदीप लष्करे, जफर शेख यांचे सह योगेश थोरबोले अजिंक्य वराळे, गिरीश अष्टगी, शशी सूर्यवंशी,दत्ता सापते,संजय आडे, प्रमोद गायकवाड, नाना भोसले, एकनाथ गुरव, दयानंद माने, इत्यादींची उपस्थिती होती.


 
Top