उस्मानाबाद/ प्रतिनिधी:-

 ः उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना राज्याचे पोलीस महासंचालक यांचे विशेष सेवा पदक मिळाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने शनिवारी दि. 10 डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी चंद्रपूर येथे नक्षलग्रस्त भागात अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्य व सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

हे पदक मिळाल्याने त्यांचा गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने पुष्पहार, शाल व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष राहुल वाकुरे-पाटील, मिडीया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक जगदीश राऊत, डकवाडीचे पोलीस पाटील शिवाजी डक, गोवर्धनवाडीचे महेश घाडगे, गोरेवाडीचे धनराज सगर, टाकळीचे (ढोकी) केशव बटनपुरे, शामसुंदर कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र गुंजकर आदी उपस्थित होते.

 
Top