तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्याचे मंञी  चंद्रकांत पाटील यांनी पैठन येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महाषुरुषां बद्दल जे वादग्रस्त  विधानाच्या निषेधार्थ आर.पी.आय.च्या वतीने  आंबेडकर चौक येथे निषेध करून  मोर्चा काढुन पोलीस निरीक्षक काशीद मार्फत मुखमंञी एकनाथ शिंदेना निवेदन  देवुन त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. 

 याप्रंसगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तानाजी  कदम,बाबासाहेब  मस्के, अरुण कदम, अमोल कदम, आप्पा कदम,वि.अध्यक्ष प्रकाश कदम,अतिश कदम,दिपक भा.कदम,रवी वाघमारे,शरद सुधीर कदम,अक्षय कदम, निशांत कदम,चेतन कदम,अनुज कदम, अंकुश माने,तानाजी डावरे,दिपक गौ.कदम,चंचाळ कदम,धनु बापू कदम राहुल सोनवणे,सोनु कदम, विनोद भालेकर, नागेश कदम,विश्वनाथ रोकडे,अकाश मस्के,डिंगबर हावळे,दाजी माने, महादेव सोनवणे,बाळु वडवराव, दशरथ सांवत व समस्त कार्यकर्ते उपस्थीत होते. 


 
Top