उस्मानाबाद / राजा वैद्य-

उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे उस्मानाबाद-सोलापूर-लातूर-पुणे जिल्हयात विविध कार्यक्रमाचे प्रसारण होत असल्यामुळे या भागात उस्मानाबाद आकाशवाणी केंद्र लोकप्रिय झाले आहे. सायंकाळच्या कार्यक्रमात या भागातील लोकगीते, पोवाडे, आराधी गाणे आदी स्थानिक सांस्कृतीक कार्यक्रमांना मोठी प्रसिध्दी मिळत होती. परंतू गेल्या कांही महिन्यापासून उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रावरील स्थानिक कार्यक्रम बंद केलेल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

 उस्मानाबाद जिल्हा  समुद्र सपाटीपासून जिल्ह्याची उंची ६०० मीटर उंचीवर असल्यामुळे उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम उस्मानाबाद-सोलापूर-लातूर-पुणे या चार जिल्हयातील परिसरात ऐकायला मिळतात. या  चार ही जिल्हयातील सांस्कृतीक कार्यक्रम असो, लोकगीत असो, आराधी गाणे आदी विविध कार्यक्रमांना सायंकाळच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळत होती. त्यामुळेच गेल्या २६ वर्षापासून उस्मानाबाद आकाशवाणी केंद्र लोकप्रिय ठरले आहे. या केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील आतापर्यंत तीन पुरस्कार मिळाले आहेत. या केंद्रामुळे स्थानिक संस्कृती टिकुन राहण्यास मदत मिळत होती. परंतू गेल्या कांही महिन्यापासून सायंकाळचे कार्यक्रम बंद झाले आहेत. फक्त पुणे-मुंबई येथुन होणारे कार्यक्रम प्रसारीत करण्याचे काम उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राकडे राहिले आहे. 

आपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण पुढे 

या संदर्भात आकाशवाणी केंद्राच्या वरिष्ठ अिधकाऱ्यांकडे चौकशी केली असता. आकाशवाणी केंद्राकडे आपुरा कर्मचारी वर्ग असल्याचे कारण सांगितले जाते. विशेष म्हणजे उमरगा येथील दुरर्शन उपकेंद्र व उस्मानाबाद येथील दुरर्शन केंद्रामधील जास्त झालेले कर्मचारी वर्ग उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात वर्ग करू शकतात. त्यामुळे कर्मचारी वर्ग अपुरा असल्याचे कारण वरिष्ठ स्तरावरून सांगितले जात असले तरी हे कारण चुकीचे आहे. उलट उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात पुरेसा कर्मचारी वर्ग असून पुर्ववत संध्याकाळचे कार्यक्रम चालू करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. 

खासगीकरणाकडे वाटचाल 

केंद्र सरकार सध्या सर्वत्र क्षेत्राचे खासगी करण करत असून उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राची ही खासगीकरणाकडे वाटचाल चालू असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ राजकीय अभ्यासक नानासाहेब पाटील यांनी सांगितले. अंत्यत चुकीच्या मार्गाने रेल्वेचे खासगीकरण जनतेवर लादले जात आहे. या खासगीकरणामुळे महागाई, दरवाढ, मनमानी आदी चुकीच्या पध्दतीने होईल, उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राची शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ११ एकर भुभाग आहे. त्याच पध्दतीने कॉर्टर आहे. केंद्राचे खासगीकरण झाल्यास याचा लाभ संबंधितांना होऊ शकतो. त्यामुळेच संध्याकाळचे कार्यक्रम बंद करण्याचे प्रकार सध्या चालू असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. 

 
Top