तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील जळकोट येथे लोखंडी दरवाज्याला होल पाडुन कडी- कोयंडा काढून घरातील  सामान व  कागदपत्रास आग लावून  अंदाजे तीन लाखाचे नुकसान  केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या बाबतीत अधिक माहीती अशी की, जळकोट, (ता. तुळजापूर) येथील - ईस्माइल खलील शेख यांच्या राहत्या घराच्या लोखंडी दरवाजाला अज्ञात व्यक्तीने  होल पाडून कडी- कोयंडा काढून घरातील सामानास व ईस्माइल यांच्या वडीलांच्या कागदपत्रास आग लावून जाळून अंदाजे तीन लाखाचे नुकसान कलेले. अशा दिलेल्या फिर्याद वरुन नळदुर्ग पोलिसांनी   भा.दं.सं. कलम- ४३६, ४२७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.,


 
Top