तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रीतुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा चालु असतानाही रविवार व नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर देवीदर्शनासाठी शहरी भागातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान ने कोरोना नवीन विषाणू पार्श्वभूमीवर देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फेस मास्क सक्ती केली असुन या सक्तीचा वापर बहुतांशी भाविक करीत असल्याचे  रविवारी दिसुन आले. माञ काही भाविकांचा  मास्क नाक तोंडाचा खाली असल्याचे दिसुन येत होते. दरम्यान  मंदीर परिसरात   मास्क ची विक्री मोठ्या प्रमाणात झाली . 

रविवारी पहाटे एक वाजता श्रीतुळजाभवानी मंदीर दर्शनार्थ खुले केले होते. तेव्हा पासुन भाविकांनी  गर्दी केली होती. दिवसभर धर्मदर्शन, मुखदर्शन,  पेड दर्शन रांगा भाविकांनी भरभरुन वाहिल्या रविवारी दुपारी धर्मदर्शनास दोनतास, पेडःदर्शनला एकतास लागत होता. देविदर्शनानंतर भाविक बाजारपेठेत पुजेचे साहित्य प्रसाद खरेदीसाठी गर्दी करीत असल्याने भाविकांची एकच गर्दी बाजारपेठेत झाली  होती.


 
Top