वाशी / प्रतिनिधी-

 येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाची विद्यार्थीनी हिंदवी परमेश्वर चौरे हिची आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक या खेळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थीनी हिंदवी चौरे हिने क्रीडा क्षेत्रातील आपले कौशल्य सिद्ध करत राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. तिची आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे. क्रिडा शिक्षक बी. आर. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. उपमुख्याध्यापक बापू सावंत, शिक्षक, शिक्षिका. शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हिंदवीचे अभिनंदन केले आहे.

 
Top