तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दुसरे राज्यस्तरीय बालाघाट साहित्य संमेलन दि.१७ डिसेंबर रोजी संपन्न होणार असल्याचे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी तुळजापूर येथील आयोजित बैठकीत घोषित केले.

 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे संमेलन तुळजापूरला आयोजित करण्याचा निर्णय सर्वांनूमते घेण्यात आला. कळंब येथे पहिले साहित्य संमेलन झालेले असुन यावर्षी तुळजापूर येथे दुसरे साहित्य संमेलन १७ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.   तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हे साहित्य संमेलन संपन्न होणार आहे, या संमेलनात उद्घाटनसत्र,परिसंवाद,कथाकथन, कविसंमेलन असे एकदिवसीय भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहेत. लवकरच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष व संमेलनाध्यक्ष जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,तुळजापूर तालुकाध्यक्ष अनिल आगलावे यांची उपस्थिती होती.


 
Top