उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 त्रैलोक्याचे स्वामी प.पू. श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सनिमित्त गुरूचरित्र पारायण, भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह, महाप्रसाद सोहळयास गुरूवारी (दि.१) मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

उस्मानाबाद-धाराशिव शहरातील श्री सदगुरू कॉलनी येथे पिताश्री श्रीमंतराव (आबा) रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त अखंड दत्तनाम सप्ताह सोहळा घेण्यात येत आहे. सप्ताहचे यंदा ८ वे वर्षे आहे. गुरूवारी (दि.१) सकाळी महंत श्री तुकोजी बाबा (तुळजापूर) यांच्या हस्ते देव-देवतांच्या पूजन विधीने सप्ताह सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी श्री दत्तगुरू महाराज यांच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, प्रभाकर चोराखळीकर, संतोष बडवे, श्रीकांत कदम, दत्ताजी लोकरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजन विधीचे पौरोहित्य सतीश जोशी यांनी केली.  दुपारी मुक्ताई मंडळाची (महात्मा गांधीनगर) भजनसेवा झाली.  मुक्ताई मंडळाचा सत्कार सौ. अंजलीदेवी रणदिवे, सौ. मंगल देवळकर, सौ. पिसाळ, सौ. काजळे यांनी केला. शुक्रवार, दि. २ डिसेंबर रोजी माऊली मंडळ (श्री गणेश नगर), शनिवार, दि. ३ रोजी विठ्ठल- रखुमाई सुयोग मंडळ (सांजारोड), रविवार, दि.४ रोजी गणगण गणात बोते मंडळ (पोस्ट कॉलनी), सोमवार, दि.५ रोजी संत जनाबाई मंडळ (शांतीनिकेतन कॉलनी), मंगळवार, दि.६ रोजी रुक्मीणी मंडळ (बँक कॉलनी), बुधवार दि. ७ रोजी शोभन मंडळ (श्री सदगुरू कॉलनी) यांची भजनसेवा, सायं. ६ वा. सुप्रसिध्द भजनसम्राट शिवकुमार मोहेकर यांची भजनसंध्या तर गुरूवार, दि. ८ डिसेंबर रोजी श्री दत्तगुरूंच्या पादुकांचा महाभिषेक, सकाळी ८ वा. गुरूचरित्र ग्रंथदिंडी, १० वा. शांतीब्रम्ह हभप नवनाथ महाराज चिखलीकर यांची कीर्तन सेवा, दु. १२.३० वा. श्री दत्तगुरुंचा जन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद होणार आहे. या सोहळ्याचा भाविक -भक्त, नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


 
Top