तुळजापूर  / प्रतिनिधी-

 काक्रंबा गाव परिसरात असणाऱ्या मल्हार धाब्यावर खुद्द पोलिस नििरक्षकांनी छापा टाकुन देशी-विदेशी दारुच्या २३ बाटल्या अवैध विक्रीचा उद्देशान जवळ बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतल्या.ही कारवाई बुधवार राञी ८.३०वा. तुळजापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने  केली.

  लातुर ते तुळजापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धाब्या हाँटेल अवैधरित्या दारु विक्रीची प्रमाण वाढले होते. या भागात राजकिय नेत्याचा धाब्यावर दारु विक्री केली जात होती. राजकिय नेत्यांनमुळे यावर छापा टाकण्याचे धाडस कुणी करीत नव्हते. अखेर पोलिस िनरिक्षकास येवुन धाड मारावी लागली. यात  देशी- विदेशी दारुच्या 23 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.


 
Top