उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या खा. राजेंद्र गावित यांचा जाहीर निषेध करीत तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यशवंत सेनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२९ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज हा एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट आहे. परंतू काही चुकीच्या शब्द उच्चारामुळे समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. या आरक्षण प्रश्नावर संसदेत खा. सुप्रियाताई सुळे यांनी आवाज उचलून धनगर आरक्षण अंमलबजावणी कधी करणार ? असा प्रश्न सभागृहात विचारला असता धनगर आरक्षणाचा विरोध खा.राजेंद्र गावित यांनी केला. या विरोधाचे पडसाद महाराष्ट्रभर धनगर समाजाच्या आंदोलनाच्या तीव्रतेतून दिसत आहेत. या वक्तव्याचा महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांच्यावतीने निषेध करण्यात येत असून येणाऱ्या काळात अशा नेत्यांनी धनगर समाजाला विरोध केला तर महाराष्ट्रातील धनगर समाज पेटून उठेल. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकारची राहील. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व आरक्षण मिळेपर्यंत ज्या २२ योजना धनगर समाजाला लागू करण्यात आलेल्या आहेत. त्या योजनांसाठी ५ हजार कोटी रुपये भरीव तरतूद करुन तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल, असा इशारा यशवंत सेना व धनगर समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. यावर संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर, सचिन शेंडगे, इंद्रजीत देवकते, सुधीर बंडगर, राजेंद्र शेंडगे, दत्तात्रय सोनटक्के, महेश कोळेकर, भिमराव श्रीनामे, राजेंद्र गाडेकर, सुमेध लांडगे, संतोषकुमार वतने, लक्ष्मीकांत खटके, चंद्रकांत बाराते, लखन सगर, राजेश बाराते, मारुती कोळेकर, विशाल कोळेकर, संजय कोळेकर, विकास कोळेकर, दयानंद खताळ, रोहन हान्हे, रमेश कोळेकर, ग.लिं. कोळेकर, पोपट मोटे, किशोर कोळेकर यांच्या सह्या आहेत.


 
Top