उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या वतीने कविसंमेलन आयोजित करण्यात आले.

 संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवि राजेंद्र अत्रे तर संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 संमेलनात कवींनी बहारदार रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संमेलनाचे सूत्रसंचालन हणमंत पडवळ यांनी केले. संमेलनात अरविंद हंगरगेकर, विजय गायकवाड, राजेंद्र अत्रे, पंडित कांबळे, प्रभाकर बनसोडे, विजय गायकवाड, शिवाजी गायकवाड आदींनी कविता सादर केली. ,कार्यक्रमास बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top