तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार दि. ५रोजी छाननी प्रक्रियेत   सरपंच पदासाठी २४९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होत. त्या पैकी छाननीत ४अर्ज बाद झाले. आता लढतीत २४५ सरपंच पदासाठी  अर्ज शिल्लक राहिले आहेत.

तसेच  ग्रामपंचायतचा ४१८  सदस्य  पदासाठी  ११९२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले  होत.े छाननीत या पैकी १७ अर्ज बाद झाल्याने आता सदस्य पदासाठी  ११७५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख बुधवार दि. ७ आहे. त्यानंतर लढतीचे चिञ स्पष्ट होणार आहे. १८डिसेबरला मतदान व २०डिसेबरला मतमोजणी होणार आहे.


 
Top