उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालयात समाज कल्याण कार्यालय उस्मानाबाद यांचे मार्फत ‘ सामाजिक न्याय पर्व ‘ निमित्त भारतीय संविधान या विषयावर  चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर स्पर्धा इ.५ वी ते १० वी चे एकूण ३७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शासनाच्या स्पर्धेत इ. ५ वी ते ७वी गटातील प्रथम क्रमांक कु. शाहिस्ता सय्यद इरफोज ६वी ब रोख १५०० रु बक्षीस द्वितीय कु. अनुष्का आशिष मायाचारी ७वी के रोख ११०० रु तृतीय चि. फरहान अझर खान ७वी ब रोख ५०० याच प्रमाणे इ. ८ वी ते १० प्रथम क्रमांक  कु. तेजस्वीनी परमेश्वर खुणे १०वी ब द्वितीय कु.कोमल बिसले १०वी एल तृतीय कु.अक्षता राहुल गायकवाड १० वी ८ वी   समाज कल्याण कार्यालय मार्फत बक्षीस समारंभात देण्यात आले त्या निमित्त प्रशालेच्या वतीने  उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी पर्यवेक्षक के.वाय.गायकवाड, आर.बी. जाधव,डी.ए. देशमुख कलाविभाग प्रमुख शिवाजी भोसले, कलाध्यापक शेषनाथ वाघ, यांच्या हस्ते बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाण पत्र , रंगपेटी देऊन सत्कार केला. या स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील सर चिटणीस सौ. प्रेमाताई पाटील,प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील सर्व संचालक मंडळ, प्मुख्याध्यापक साहेबराव देशमुख यांनी अभिनंदन केले.लिपीक गणपत उपासे ,शहाजी देशमुख यांनी सत्कार समारंभ यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सुत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले तर आभार नरसिंग साळुंके यांनी मानले .

 
Top