उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज (महाराज) साळुंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे कळंब तालुका कार्याध्यक्ष  सुहास बारकुल, येरमाळा सर्कल प्रमुख संजय बारकुल यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवेसेनेत जाहीर प्रवेश केला.

 सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जिल्हाप्रमुख श्री.साळुंके यांनी स्वागत करून सर्वांना पक्षात सन्मानाची वागणूक मिळेल अशी ग्वाही दिली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज (महाराज) साळुंके, शहरप्रमुख सनी पवार, विजय बारकुल, कमलाकर दाने, प्रशांत पाटील,राहुल सुरवसे उपस्थित होते.


 
Top