उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत जिल्ह्यातील अनु. जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यीनींनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केले. यशस्वी खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड झाली.

 दि. 16 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 14 वर्षे वयोगटातील 100 मीटर रीले प्रकारात ‍निवासी शाळेच्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला. यामध्ये सहभागी खेळाडू कु. सोनम सगट, कु. प्रज्ञा भोसले, कु. प्रेरणा क्षिरसागर, कु. सुहानी धावारे यांची जिल्हा स्तरावर निवड झाली. 17 वर्षे वयोगटातील 100 मीटर रीले प्रकारात कु. साक्षी बनसोडे, कु. मेघा वाघमारे, कु. नेहा टोणपे, कु.दिक्षा रोकडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. 17 वर्षे वयोगट थाळी फेक प्रकारात कु. अनुजा शेंडगे हिने तृतीय क्रमांक पटकावला. 14 वर्षे वयोगट गोळा फेक प्रकारात कु.प्रज्ञा भोसले हिने द्वितीय क्रमांक पटकावला. 17 वर्षे वयोगट थाळी फेक व गोळा फेक प्रकारात कु. दिक्षा कल्याण रोकडे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला.

सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक कांदे यु.एस. तसेच रेणेवाड सर, मुळे सर, भोईटे सर, पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका पांचाळ एस.एस. यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.


 
Top