तुळजापूर / प्रतिनिधी-

 ‘सीआयडी’ ने उघड केलेल्या तुळजाभवानी मंदिरातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचा-यांनवर  त्वरित कारवाई करून त्वरित गुन्हे दाखल करा या मागणीसाठी    हिंदु जनजागृती समिती च्या वतीने तुलजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने िहंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. 

 आंदोलन दौरान विभिन्न मान्यवरों ने मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ सर्व दोषींवर एफ.आय.आर्. (FIR) दाखल करावा. त्यांना अटक करावी व त्यांच्या कडुन लुटीची रक्कम चक्रव्याजासह वसुल करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर  हिंदू जनजागृन समितीचे राजन बुणगे यांची स्वाक्षरी आहे.आंदोलनात महंत व्यकंट अरण्य महाराज, सुदर्शन वाघमारे,अमित कदम,संदीप बगडी,दीपक पलंगे, परीक्षित साळुंके, अर्जून सांळुके  अजय साळुंके, प्रशांत सोंजी, सरर्वोतम जेवळीकर, सुरेश नाईकवाडी आदींनी भाग घेतला. 

 
Top