सध्या विधानसभेत बोलण्याची संधी िमळत नाही हे आपण टिव्हीवर पाहता त्यामुळे विधानसभेत बोलण्याची संधी िमळाल्यास उस्मानाबाद शहरतील विकास कामावर आणलेली स्थगिती हा मुद्दा माडणार आहे, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे अामदार कैलास पाटील यांनी बोलताना दिली.
गेल्या चार दिवसापासून उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू केले आहे. गुरव यांच्यासोबत रवी वाघमारे, पंकज पाटील, अजय नाईकवाडी हे बसले आहेत. पत्रकारांशी बोलताना अामदार कैलास पाटील यांनी निविदा प्रक्रिया न उघडता निवदा प्रक्रियामध्ये अनियमितता झाली आहे, असा शोध लावला आहे. केवळ शहरातील नागरिकांना सोई-सुविधा मिळु नये एवढयासाठीच विकास कामावर स्थगिती आणल्याचे सांगितले. हे विकास कामे मार्च पर्यंत केले नाही तर त्यासाठी आलेला निधी अखर्चीत राहून शहराचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
सोमनाथ गुरव