तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर - तालुक्यातील मंगरुळ  येथे नुकतीच मोबाईल माध्यमातून  मुलीची छेडछाड केल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर  येथील इंदिरा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार दि. १रोजी  उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या योजनेतून जिल्हाभरा मध्ये सुरू असलेल्या पिंक पथक प्रमुख श्रीमान राकेश बनसोडे,  पोलीस उपनिरीक्षक उपविभागीय अधिकारी कार्यालय यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

  याप्रसंगी गावातील पोलिस पाटील  लक्ष्मण माळी, उपसरपंच गिरीश डोंगर, पोलीस हवालदार  मांडवले , लक्ष्मण माळी यांनीही आपले विचार मांडले.

  या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य  सुदर्शन शिंदे  यांनी  पोलीस विभागातर्फे सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.याप्रसंगी विद्यालयातील   जब्बार शेख , प्रभाकर चव्हाण   सुनंदा बचाटे, डोंबाळे बंडू , बालाजी डोंगरे , उंबरे मीना , बनसोडे अनिल, कुसुम करप,  बालाजी गुरव,  कल्पना मशाळकर  , आशिष साठे  व   ज्ञानदेव लोहार , शिवाजी पारधे, विजया जाधव व पाचवी ते बारावी  वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top