तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील सलगरादिवटी येथील प्राथमिकआरोग्य केद्राने  विविध योजनेत रुग्णांना उत्कृष्ट सेवा पुरवल्याबद्दल जिल्हयात अव्वल आला आहे. सलगरा दिवटी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी  डाँ.अनिल,वाघमारे यांच्यासह येथील डाँक्टर, कर्मचार, नर्स कामगार आशा कार्यकर्त्या  यांचे सर्वञ अभिनंदन केले जात आहे.

 यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे   वैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली. सदर बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हलकुडे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कुलदिप मिटकरी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ व इतर सर्व जिल्हा स्तरीय अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आरोग्य विभागातुन सनियंत्रण करण्यात येणारे माता व बाल संगोपन कार्यक्रम, लसीकरण, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, प्रा.आ.केंद्रा अंतर्गत सेवा व सुविधा, पोर्टल वरील कामगिरीचे सर्व निर्देशांक, अनिमियॉ मुक्त भारत तसेच साथरोग, क्षयरोग, हिवताप इत्यादी घटकांचे दरमहा मुल्यांकन करण्यात येते. त्या सर्व निर्देशांका मध्ये प्रा.आ.केंद्र सलगरा (दि.) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे व प्रा.आ.केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी, आशा यांच्या परिश्रमाने प्रा.आ. केंद्र सलगरा (दि.) यांनी जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

 त्या अनुषंगाने प्रा.आ.केंद्र सलगरा (दि.) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांचा प्रथम आल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.


 
Top