उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अवघ्या दहा वर्षे पूर्ण झालेल्या सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने समाजामध्ये विश्वासाहर्ता निर्माण केलेली आहे.  तुळजापूर येथे श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चा ग्राहक मेळावा संपन्न झाला.

 यावेळी शहरातील प्रतिष्ठित अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री सिध्दीविनायक प्रतिमा पूजनाने झाली. श्री सिध्दीविनायक सोशल फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक यांनी सिध्दीविनायक परिवाराचा स्थापनेपासून ते आजपर्यंत विविध क्षेत्रांमधील कार्याचा लेखाजोखा सांगितला. मागील दहा वर्षापासून सिध्दीविनायक मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, तुळजापूर या शाखेने केलेल्या व्यवसायाचे अहवाल वाचन श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश जाधव यांनी केले. यावेळी बोलताना संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक उद्योजक घडवण्याचे कार्य झालेले आहे व महिलांना पतपुरवठा झालेला आहे असे त्यांनी सांगीतले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास कुलकर्णी यांनी केले.

 या कार्यक्रमास नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे तसेच सभासदांनी उपस्थिती दर्शविली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन हुंबे, रोहित दळवी व तुळजापूर शाखेतील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

 
Top