तुळजापूर/ प्रतिनिधी-

 शहरातील शुक्रवार पेठ भागातील नगरपरिषदचे पथदिवे दिवसा ही चालुच  राहत  असल्याने नगरपरिषद  प्रशासनाचा निष्क्रिय कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

या भागातील पथदिवे बरेच दिवस दिवसाही चालुच असतात एकादा दुसरा दिवस पथदिवे लाईट बंद केली जात आहेत. यामुळे नागरिकांच्या करांचा पैशाची उधळपट्टी चालुच असल्याचे स्पष्ट होते. सध्या नगरपरिषद खाते न्यायालयाने गोठवले त्यातच भरदिवसा पथदिवे चालुच आहेत .

  नगरपरिषदची पथदिवे व  पाणीपुरवठा वीज थकबाकी  कोट्यावधी रुपये थकीत आहे. पाणीपुरवठा वीजथकबाकी पोटी महावितरणने  शहराचा पाणीपुरवठा खंडीत केला होता.  या प्रकरणी जिल्हाधिकारी  व आमदार यांनी लक्ष घातल्या नंतर चालु बिल भरल्या नंतर पाणीपुरवठा वीज पुरवठा जोडल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरुळीत झाला होता . 


 
Top