तुळजापूर/ प्रतिनिधी-

महाराष्ट्रात हे पहिले न्यायालय असेल जे पेपरलेस काम सुरू करत आहे, असे प्रति मा. श्रीमती अंजु एस शेंडे  केले. 

त्या तुळजापूर जि . उस्मानाबाद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील ई - प्रकरण प्रणाली , विधिज्ञ मंडळातील संगणक , ई - ग्रंथालय , ई - मुद्देमाल विभाग , ई - पुस्तक ग्रंथालय विभागाचा उद्घाटन समारंभ व कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर शुभारंम प्रसंगी बोलत होते.  

या प्रसंगी    जिल्हा न्यायाधीश श्री गुप्ता साहेब व तुळजापूर न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश  मिलिंद एम.निकम , सह दिवाणी न्यायाधीश पि.जी.एस. चाळकर , 2 रे सह दिवाणी न्यायाधीश श्री कुलकर्णी  व उमरगा, परंडा, भुम, उस्मानाबाद येथील न्यायाधीश वर्ग उपस्थित होते. तसेच तुळजापूर विधीज्ञ संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी ज्येष्ठ विधीज्ञ  के.डि. कुलकर्णी, तांबे साहेब, शेटे साहेब, पवार साहेब, ढवळे साहेब व सर्व विधीज्ञ संघाचे सदस्य उपस्थित होते.

 या वेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश शेंडे म्हणाले कि आपल्या महाराष्ट्रात हे पहिले न्यायालय असेल जे पेपरलेस काम सुरू करत आहे यामुळे न्यायदान प्रक्रियेत वेग होवुन वेळ पैसा श्रम वाचेल असं   श्रीमती अंजु एस शेंडे  यांनी सांगितले. तसेच सदरील प्रणाली बदलचे फायद्याचे महत्व सांगितले.

 महीला विधीज्ञ संगिता कोळेकर, उपाध्यक्ष शिला कोळेकर, अंजली साबळे, फुलारी मॅडम, शिंदे मॅडम, गायकवाड मॅडम, इतर उपस्थित होते.


 
Top