तुळजापुर / प्रतिनिधी-

 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित दुसरे बालाघाट मराठी साहित्य संमेलन सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 17 डिसेंबर 2022 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे संपन्न होत असून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे.तर संमेलनाच्या नियंत्रकपदी योगेश केदार यांनी निवड करण्यात आल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी दिली आहे.

 ऐतिहासिक तुळजाई नगरीत सम्पन्न होत असणाऱ्या संमेलनाचा शुभारंभ उद्घाटन सत्राने होणार आहे, विशेष अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील भूषवणार आहेत.

 उद्घाटन सत्रानंतर सुप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. सतीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्यात मराठवाड्याचे योगदान हा परिसंवाद होणार असून संगीता जामगे,सर्जेराव वाघमारे आदी मान्यवर वक्ते सहभागी होणार आहेत.त्यांतर सुप्रसिद्ध कवी युवराज नळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे,यामध्ये विलास हडवले, राजेंद्र अत्रे,मयुरी बाबर,दास पाटील या कविसह अनेक मान्यवर कवींचा सहभाग असणार आहे.

 या साहित्य संमेलनात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.  या साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजन मराठवाडा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर पालकर,तुळजापुर तालुका अध्यक्ष अनिल आगलावे, तर संयोजन समितीमध्ये  तालुका उपाध्यक्ष भाग्यश्री देवकते,सचिव प्रा.डॉ.अविनाश ताटे, कोषाध्यक्ष जयमाला वटणे,कार्यवाहक राहुल दुलंगे आदीजन मागील एक महिन्यापासून अविरतपणे संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.


 
Top