उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे DRAT (कर्ज वसुली न्यायाधिकरण) कोर्टाने आदेश दिले आहेत.

 उस्मानाबाद जिल्हा बँकेनी टेंडर प्रक्रिया राबवलेली ती योग्य असल्याचे आदेश दिले आहेत.माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली आहे. भैरवनाथ समूहाला आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याचा मार्ग या आदेशामुळे मोकळा झाला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये जिल्हा बँकेने तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याची कारवाई झाली होती मात्र माजी मंत्री अमित देशमुख यांच्या समूहाने कोर्टात याचिका दाखल केली होती. तब्बल एक वर्षाच्या न्यायलयीन लढाई नंतर तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाला मिळणार आहे त्यासाठी जिल्हा बँकेने पुढील प्रक्रिया तात्काळ राबविणे गरजेचे आहे.

 उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 6 डिसेंबर 202 रोजी जिल्हा बँक,अवसायक व भैरवनाथ शुगर यांच्यामध्ये तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योगसमूहला 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली मात्र त्यानंतर भाडेतत्वावरच्या निविदा प्रक्रियावर शंका घेत ट्वेंटीवन शुगरने न्यायालयात धाव घेतली. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला भविष्य निर्वाह निधीचे सील असून जीएसटी वस्तू व सेवा कर,महावितरण, राज्य उत्पादन शुल्क या विभागाची थकबाकी आहे.

 
Top