तेर /प्रतिनिधी
संत श्रेष्ठ गोरोबा काकांच्या पावन नगरीत .25 डिसेंबर पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व भव्य किर्तन महोत्सवास वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रागंणात प्रारंभ होणार असून याकाळात नामवंत किर्तनकारांची किर्तन होणार असल्याची माहिती ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी यांनी दिली.
25 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत विविध नामवंत प्रवचनकार व किर्तनकार उपस्थित रहाणार आहेत भागवताचार्य शिवानंद महाराज शास्त्री पैठण हे कथा वाचन व अर्थनिरूपन करणार आहेत.
रविवार दि.25 डिसेंबर रोजी प्रफूल महाराज मोरे यांचे व विनोदाचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे किर्तन 26 डिसेंबर रोजी ह.भ.प.विजय महाराज बालगीर ह.भ.प.श्रीकांत महाराज कदम व ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे यांचे किर्तन.27 डिसेंबर मंगळवार रोजी ज्ञानेश्वर महाराज सोनवणे व पार्थ महाराज फावसे व सांयकाळी संजय महाराज धोंडगे यांचे तर बुधवार दि.28 रोजी विजय महाराज डक व सांयकाळी समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन होणार आहे 29 डिसेंबर रोजी .सकाळी विनोदाचार्य कालीदास नाईकनवरे व सांयकाळी ह.भ.प.जयवंत महाराज बोधले 30 डिसेंबर रोजी सकाळी हरी महाराज चाकूरकर व ह.भ.प.विनोदाचार्य शिवा महाराज बावस्कर यांचे तर 31 डिसेंबर रोजी सकाळी भागवताचार्य महारूद्र महाराज पवार यांचे तर सांयकाळी भागवताचार्य विनोदवीर विशाल महाराज खोले यांची किर्तनसेवा होणार आहे. 1 जानेवारी 2023 रोजीह.भ.प.गोविंद महाराज पांगारकर यांचे काल्याचे किर्तनानंतर महाप्रसाद होऊन या महोत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प.रघुनंदन महाराज पुजारी यांनी केले आहे.