तुळजापूर  / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील किलज येथील दैनिक पुण्यनगरी चे   पत्रकार रवीचंद्र गायकवाड (वय ३९) यांचा दि.१८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास किलज ते चिकुंद्रा रस्त्यावरील मारखोरी तांडा नजीकच्या रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले.  त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,उपचाारा दरम्यान त्यांचे रूग्णालयात सकाळच्या सुमारास दि.१९ डिसेंबर रोजी निधन झाले. 

पत्रकार रवीचंद्र गायकवाड यांनी आपल्या पत्रकारिता क्षेत्रातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती.त्यांच्या पश्चात आई,वडील, भाऊ,पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.त्यांच्या पार्थिवावर दि.१९ डिसेंबर रोजी किलज येथे मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top