उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धाराशिव शहरातील प्रभाग चारमधील बाळासाहेब ठाकरेनगर येथे ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा व जनकल्याण शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत   साळुंके यांनी बुधवार, 14 डिसेंबर रोजी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते.

 प्रभाग चारमधील नागरी समस्यांचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर त्यांनी जनकल्याण शिबिर आणि सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेह मेळाव्याचे बुधवारी आयोजन केले.  सकाळी 11 ते 5 या वेळेतजनकल्याण शिबिर तर ज्येष्ठ नागरिक मेळावा सायंकाळी 4 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आले. जनकल्याण शिबिरामध्ये संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेसाठी पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एकूण 109 जणांची नोंदणी करण्यात आली.

 सायंकाळी झालेल्या स्नेहमेळाव्यात 140  ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने खास स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आलेले होते. साळुंके यांच्या समाजोपयोगी उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकानी कौतुक केले. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.


 
Top