उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती (DATSWA) द्वारे परभणी येथे आयोजित विभागीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा 2022 मध्ये उस्मानाबाद जिल्हा कोषागार कार्यालयाने विभागात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विविध क्रीडा प्रकारामध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन यश संपादन केलेल्या सर्व खेळाडूंचे कौतुक जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे यांनी केले आहे.

 सांघिक क्रीडा प्रकारातील खो-खो (महिला) प्रथम क्रमांक आणि थ्रो-बॉल (महिला) मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. गोळाफेक (पुरुष) मध्ये आकाश भोपळे, लांब उडी (महिला) मध्ये प्रज्ञा साळवे, टेबल टेनिस दुहेरी (महिला) मध्ये पूजा दळवे आणि अर्चना म्हेत्रे आदींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. टेबल टेनिस एकेरी (महिला) मध्ये पूजा दळवे, बॅडमिंटन दुहेरी (पुरुष) मध्ये बसवेश्वर वाळके आणि शुभम पाटील, टेबल टेनिस दुहेरी (पुरुष) मध्ये निलेश बारकुल आणि रामकृष्ण डंके, टेबल टेनिस एकेरी (पुरुष) मध्ये निलेश बारकुल, थाळीफेक (महिला) मध्ये प्रज्ञा साळवे, पाच किमी चालणे (पुरुष) मध्ये चंद्रशेखर काजळे, तीन किमी चालणे (महिला) मध्ये आशा सुर्यवंशी आणि कॅरम दुहेरी (पुरुष) मध्ये विकास भगत आणि नितीन पवार आदींनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 100 X 4 रिले (महिला) मध्ये पूजा दळवे, वसुधा हुलसूरकर, राजश्री बडगुजर आणि अर्चना नरवडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 
Top