तेर /प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ( पेठ ) येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्रारंभी मुख्याध्यापक विक्रम खडके यांच्या हस्ते भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय गणित दिनानिमित्त इयत्ता पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांचे गणित विषयांवर आधारित बेरीज वजाबाकी गुणाकार आदि गट तयार करत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते =यावेळी मुख्याध्यापक विक्रम खडके , गोरोबा पाडुळे , गणपती यरकळ , गिरे चंद्रकांत , देशमुख शशिकांत , चौरे गोरख , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे  , शेजाळ वर्षा , नाईक उषा , मुंढे प्रभावती , हलसीकर रोहिणी , पांचाळ शकुंतला आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  प्रश्नमंजुषा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 
Top