उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद नगर परिषदेअंतर्गत मंजूर असलेल्या विविध विकासकामांना देण्यात आलेली मंजुरी उठविण्यासाठी मुख्याधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अनिल खोचरे यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 निवेदनात म्हटले की, उस्मानाबाद नगर परिषदेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2021-22 अंतर्गत सुवर्णजयंती नगरोत्थान योजना, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अशा विविध विकासकामांना दिलेली स्थगिती उठविण्यासाठी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी मुख्याधिकारी व संबंधित स्थानिक अधिकार्‍यांची बैठक बोलावून मंजूर कामे पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी श्री.खोचरे यांनी केली आहे.

 
Top