परंडा / प्रतिनिधी - 

तालुक्यातील भोंजा हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राहिलेल्या वंचित विद्यार्थ्यांना गुरुवार दि.१५ रोजी स्वेटर वितरीत करण्यात आले.

 हिवाळा म्हटलं की सर्वांना स्वेटर असावा वाटतो म्हणून आज सनराईज सेक्युरीटी फॉर्स पुणे येथील उद्योजक डायरेक्टर तुकाराम बारस्कर, डायरेक्टर शाम पांडे, पवनकुमार पांडे यांनी लहान विद्यार्थी मुलांसाठी मोफत स्वेटर वितरीत केल्याने शालेय विद्यार्थी कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

  यावेळी लघुउद्योग सल्लागार डायरेक्टर गणेशदादा नेटके, बागायतदार अमोल मोरे, मुख्याध्यापक हनुमंत पाटील, शिक्षक वृंद आदिकराव शेळवणे, संचालक शशिकांत कुलकर्णी, संचालक बाळासाहेब नेटके, महेश मांजरे, श्रीमती माळी मॅडम, श्रीमती राऊत मॅडम व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top