परंडा/ प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.महेशकुमार माने यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २११६ च्या अनुषंगाने विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ प्राधिकरणासाठी दि.१०डिसेंबर २०२२ रोजी निवडणूक घेण्यात आली होती, दिनांक १३ डिसेंबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली होती.या मतमोजणी निकालानुसार डॉ महेशकुमार माने यांची अभ्यास मंडळ भौतिकशास्त्र प्राधिकरणावर कलम ४० (२)(c) अन्वये निवड करण्यात आली आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी नियुक्तीपत्र देऊन  अभिनंदन केले डॉ. महेश कुमारमाने यांच्या निवडीमुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील नाना शिंदे, माजी प्राचार्य डॉ दीपा सावळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी अभिनंदन केले.डॉ महेशकुमार माने यांच्या निवडीमुळे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते शाल भुके देऊन सत्कार करण्यात आला. 

या सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ अरुण खर्डे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ प्रकाश सरवदे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा अमर गोरे पाटील, प्राध्यापिका सौ डॉ वैशाली थोरात, श्रीमती देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले.शेवटी डॉ महेशकुमार माने यांनी त्यांचा सत्कार केल्यामुळे सर्वांचे आभार मानले. 


 
Top